Saturday, July 21, 2018

बदलापूर चा इतिहास

बदलापूर व परिसराचा शिलाहारकालीन इतिहास

 अंबरनाथ येथील सुप्रसिद्धशिवमंदिर

 देवळोली गावाजवळील चावीच्या आकाराची विहीर.                         \ बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळोली गावात असलेली चावीच्या आकाराची ही दगडी विहीर आहे
चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेस कल्याणपुढे जाण्यापूर्वी त्यांचे सैन्य या भागात तळ करून होते. त्या काळात त्यांनी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या आहेत. त्यातील ही एक विहीर
काय आहे विहिरीत?
ही विहीर पुढून गोलनंतर निमुळती होत गेली असून तिचा आकार शिविलगाच्या शिळेसारखा किंवा चावीसारखा आहे. यात विहिरीत उतरण्यास पंधरा ते अठरा पायऱ्या असून आत चार-पाच पायऱ्या उतरल्यावर दोन बाजूला दिवे लावण्यासाठी कोनाडे आहेत. तसेच विहिरीच्या मुख्य द्वारावर गणपतीअन्य दोन देवतांच्या मूर्ती असून त्यातील एक मूर्ती शस्त्रधारी आहे. या मूर्तीच्या बाजूच्या भिंतीवर दोन मुखभंग झालेल्या सिंहाच्या मूर्ती आहेत. तसेच या द्वाराची कमान गोलाकार असून त्यावर फुले कोरण्यात आली असून विहिरीचा प्रत्येक दगड हा एकमेकांमध्ये सांधेजोड पद्धतीने अडकवून बसवलेला आहे.
शिरगाव परिसरात शिलाहारकालीन राजवटीतीलगधेगाळ
गधेगाळ’, ‘वीरगळआदी शिलाकृतींसह पुरातन अवशेष आढळले; शिलाहार राजवटीतील ऐतिहासिक संदर्भ 
बदलापुरातील ऐतिहासिक घडामोडींचामंदिरांचा ठेवा शिवकाल ते पेशवेकालापर्यंत मागे जात असला तरी आता यापेक्षाही प्राचीन काळातील इतिहासाचे महत्त्वाचे दुवे अभ्यासकांच्या शोधातून पुढे येऊ लागले आहेत. बदलापुरातील शिरगाव परिसरात शिलाहारकालीन राजवटीतीलगधेगाळहा राजाज्ञा दर्शवणारा शिलालेख आढळला असून शहरानजीक बहुतांश मंदिरात पुरातन मंदिरे, विहिरी आदींचे अवशेष आढळू लागले आहेत.
गावदेवी मंदिराबाहेर पुरातन मंदिरांच्या खांबांचे अवशेष व काही शंकराच्या पिंडी



गावदेवी मंदिराबाहेर पुरातन मंदिरांच्या खांबांचे अवशेष पडले असून त्यांना शेंदूर फासण्यात आले आहेत .



राहटोली गावा जवळ किमान पाच फूट लांबीची शिवपिंडीच्या आकाराची मोठी शिळा

बदलापूरजवळील राहटोली या गावात नारायण जाधव यांच्या शेतात फार पूर्वीपासूनच शिवलिंगसदृश शिळा होती. २०१३ मध्ये त्यांनी शेतीसाठी खोदाई केली असता त्यांना २० फूट लांबीचा जुनाट दगडी जोता आढळला त्यात अजून खोदाई केली असता किमान पाच फूट लांबीची शिवपिंडीच्या आकाराची मोठी दुसरी शिळा आढळली .

शिलाहारकालीन राजवटीतीलगधेगाळ आणी वीरगळ

वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेलेअसते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलासाला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते. या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते.काही वीरगळांवर शिलालेखही असतात
वीरगळ प्रमुख प्रकार दोन -
१) आयताकृती वीरगळ फक्त समोरुन किंवा ३बाजूने कोरलेली

२) स्तंभ वीरगळ चारही बाजूने कोरलेली
उपप्रकार
ज्यामुळे वीरगती मिळाली त्यानुसार वर्गीकरण.
१.वीरबळी वीरगळ ही जे वीर राजा युद्धात जिंकावा म्हणून स्वतः स्वतःच्या हाताने शिरच्छेद करुन घेत त्यांची शिळा.
२.गोवर्धन/गोधन वीरगळ यादव काळात गोधन हेच श्रेष्ठ धन होते मग त्याची प्राणी वा दुसऱ्या गावाकडूनगोवर्धन/गोधन वीरगळ
३.पशु वीरगळ गावावर झालेला वाघ, रानगवे इ पशूंचा हल्ला परतवताना आलेले वीरमरण
४.द्वंद्व वीरगळ दोन गावातील तुल्यबळ वीरांचे युद्ध/ कुस्ती यात आलेले वीरमरण
५.डोली वीरगळ लग्न विधीत झालेले हल्ले, विघ्न दूर करताना आलेले वीरमरण.
६.गाववली परचक्र युद्ध एक वीर अनेकांशी लढताना आलेले वीरमरण
७.अश्वदल/गजदल वीरगळ मोठ्या युद्धात आलेले वीरमरण
८.चौर्य वीरगळ चोरांचे हल्ले परतवताना आलेले वीरमरण.यात चोरांकडे तलवारी तर ते लढणारे सामान्य असल्याने त्यांच्याकडे काठी असे चित्र कोरलेले असते.
९.साधू/संत वीरगळ राक्षसांचे हल्ले परतवताना साधूंना आलेले वीरमरण.
१०.सूर वीरगळ या शिलेवर अनेक वाद्य असतात. /एखाद्या कलाकारांचे वीरमरण
११.ताबूत वीरगळ विशेष स्मृती असलेल्या शिळा

चिखलोली गावा जवळील सती ची शिळा


बेलवली गावा जवळील शिळा शिल्प (वीरगळ )



ट्रिंगलवाडी किल्या वरील  काही शिळा शिल्प (वीरगळ )

 अक्षीचा शिलालेख 

अक्षीचा शिलालेख हा शा.श. ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ मधील मराठीतील पहिला शिलालेख आहे हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे.
अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे.
शिलालेखाचा अर्थ:-
जगी सुख नांदो.पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो

गावदेवी मंदिराबाहेर पुरातन मंदिरांच्या खांबांचे अवशेष पडले असून त्यांना शेंदूर फासण्यात आले आहेत
 वांगणी  गावा जवळील काही शिळा शिल्प
 नालंबी गावा जवळील लाकडात कोरलली शिल्प (लाकडातील देव )

बोहोनोली गावातील काही आदिवाशांचे लाकडात कोरलेले देव देवता

नेवाळी विमानतळा च्या ब्रिटिश कालीन  काही खुणा
हाजी मलंग गडा जवळील शिवमंदिर व काही शिल्प ,तेथील ऐका गधेगाळा वर शिलालेख कोरलेला आहे .


अंबरनाथ MIDC परिसरातील शिळा शिल्प (वीरगळ )


 ढोके  गावा जवळील  चैरोबा 

 बोहोनोली गावातील वाघोबा



गोविंद धाम येथील शिळा शिल्प
बदलापूर MIDC परिसरातील शंकराच्या पिंडी)


'गधेगळ स्मारक'.

No comments:

Post a Comment