साधारण ५ व्या शतकातली ही लेणी - caves from 5th Century
बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे
प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात. गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत.
No comments:
Post a Comment